प्रतिष्ठा न्यूज

रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन, महामंडळाचे कोषाध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, धार्मिक, उद्योग यासह विविध क्षेत्रात मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

रावसाहेब पाटील यांचा ६६ वा वाढदिवस गणेशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुधीर गाडगीळ, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भारती सहकारी बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक सकळे, एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, वसंतराव नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम व संचालक, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, चंद्रकांत पाटील, सत्यविजय बँकेचे बाळासाहेब पवार, शशिकांत राजोबा, प्राचार्य डी. डी. चौगुले, निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील, मिरज मतदारसंघाचे युवा नेते सुशांत खाडे, अहिल्यादेवी शिक्षणचे आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, प्रा. एन. डी. बिरनाळे तसेच सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील विविध भागातून असंख्य हितचिंतक, कार्यकर्ते, मित्रपरिवार, विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी, नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.