प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या रामदेव ट्रस्टचा 190 वा रामोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :१९० वा श्री रामनवमी सोहळा श्री रामदेव ट्रस्ट तासगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यावेळी हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थिती मध्ये श्रीरामाच्या जय घोषात मंदिर परिसर दुमदुमून निघाला.श्री रामदेव ट्रस्ट तासगावच्या वतीने 190 वा श्री रामोत्सव साजरा करण्यात आला.प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र पाडवा 9 एप्रिल 2024 पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.काकड आरती, महाआरती,जनजागृती प्रभात फेरी, भजन,प्रवचन,कीर्तन असे नित्य कार्यक्रम राबविण्यात आले.आज रामनवमी दिवशी सकाळी१० ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत श्रींच्या जन्म काळाचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. ह.भ.प.श्री महेशबुवा काणे यांनी श्रावण बाळाची कथा सांगताना, सध्याच्या युगात प्रत्येक घरी श्रावणबाळ जन्माला यायला हवा या श्रावण बाळाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.श्री काणे बुवांच्या सुमधुर वाणीतील सुश्राव्य कीर्तनाने श्रीराम भक्त तल्लीन होऊन गेले होते.यावेळी रामदेव ट्रस्ट तासगावचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप जोगळेकर यांनी श्री रामोत्सव यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पुढील काळात नागरिकांनी असेच सहकार्य करण्याचे  आवाहन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.