प्रतिष्ठा न्यूज

गुरुपौर्णिमेचे महत्व

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुर्साक्षात परब्रहम, तस्मै श्रीगुरुवे नमः ।।
अशी गुरुची व्याख्या आपल्या भारतीय संस्कृती मध्ये केली आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. कारण हा दिवस म्हणजे महाभारताचेंनी लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे, म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते.गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचिन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आषाढ पौर्णिमच्या दिवशी बुध्दांनी पाच भिक्षूंना पहिल धर्मोपदेश दिला, ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमा नावाने प्रचलित आहे. गुरु म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश आपल्या गुरु कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच, आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आपली आई, कारण आई आपल्याला चालायला बोलायला व जगायला शिकवत असते. जगातील प्राथमिक शिक्षण आपण आपल्या प्राथमिक शिक्षण प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो. गुरुची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ हि शिकवण दिली जाते . गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो, या शिकवणीमुळेच गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
आई वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरुची देखील गरज असते. खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सूख, व समुद्ध करण्याचा योग्य मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सद्गुरूंचा मान देतात.
गुरुपौर्णिमेला ‘गुरुपूजन’ करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरु बद्दल कृतज्ञ असणं या कृतज्ञतेपोटी गुरुची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपुजन, अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळत असते. शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. गुरूसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.आयुष्यभर गुरुनी दिलेले ज्ञान आणि शिकवल्यामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात, गुरु हे देवाचेच रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रुपाने आपल्या जीवनात सारथ्य करत आहे. अशी ज्या शिष्याची भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण समजले जाते.
वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपुजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्त्वांचे पालन यांना महत्व दिले आहे. गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तपस्वी, आदरणीय अवस्था असते. गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकते. मानवी संस्कृती गुरुचे महत्त्व नेहमीच अन्यसाधारण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना संकटाशी भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतो. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्य मानले गेले आहे. बालकास पहिली गुरु हे त्यांचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात.
गुरुचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांनी आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे कार्य असते. ज्ञान देतांना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार नाही, अशी भावना गुरुकडे नसावी. जेव्हा गुरूने दिलल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून गुरुला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु म्हणावा. शिष्याला जितकी गुरुची गरज असते तितकीच गुरुला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरु आपले ज्ञान कोणाला देणार, म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे . शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेल ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे केल्यास शिष्याच्या व गुरुच्या ज्ञानात बळ व साधना निर्माण होते. आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.
आई-वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात. या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवलं. गुरुना वय,रूप,जाती व धर्माचं बंधन नसतं गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात
गुरूंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतके महान आहे.
शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
” गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा.
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे,
मूल आयुष्याचे जाणून घ्यावे,
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे.”

” सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! ”
लेखक – श्रीराम साहेबराव महाजन
कलाशिक्षक
चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर, मुंबई

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.