प्रतिष्ठा न्यूज

2 ऑक्टोंबरला गांधी मरत नसतो लघुपटाचा प्रीमियर शो

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा गांधीजींचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असलेल्या गांधी मरत नसतो या मराठी दीर्घ लघुपटाच्या प्रीमिअर शो बुधवार दि. 2 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये निर्मिती फिल्म क्लबच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर आणि बालकलाकार आदित्य म्हमाने, मंथन जगताप यांनी दिली.
गांधी मरत नसतो या दीर्घ लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक छाया पाटील, अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे, व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे यांनी काम पाहिले आहे.
कथा डॉ. शोभा चाळके यांची तर संवाद अनिल म्हमाने यांचे असून डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. निकिता खोबरे, दत्तात्रय गायकवाड, दिपक गोठणेकर, स्वप्निल गोरंबेकर, शंकर पुजारी, वर्षा सामंत, नूतन गोंधळी, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, स्वरा सामंत, मंथन जगताप, अन्वय म्हमाने, स्वरल नामे, पृथ्वीराज वायदंडे, साईराज निकम, पृथ्वीराज बाबर, सई शेवाळे, भक्ती व भूमी भस्मे, शब्बीर काझी, दिग्विजय कांबळे, रोहीत चांदणे, मारुती गायकवाड यांच्यासह शंभरहून अधिक कलाकारांनी यात काम केले आहे.
पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, विश्वास तरटे, सनी गोंधळी, अरहंत मिणचेकर, नमिता धनवडे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.