प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील होमीओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या वतीने एचआयव्ही प्रतिबंधासाठी जनजागृती

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  गुलाबराव पाटील होमीओपॅथीक मेडिकल कॉलेज, मिरज आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त वि‌द्यमानाने दि. ०६ ऑक्टो. २०२४ रोजी फ्लॅश मॉबचे (एचआयव्ही प्रतिबंधासाठी जनजागृती) आयोजन करण्यात आले होते. त्याचे प्रातिनिधिक सादरीकरण महात्मा गांधी चौक, मिरज आणि उत्तमनगर या ठिकाणी पार पडले. एचआयव्ही आणि एसआयटी यांचा वाढता प्रसार पाहता त्याची जागृती लोकांमध्ये व्हावी यासाठी गुलाबराव पाटील होमीओपॅथीक मेडिकल कॉलेज नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे (चेअरमन रेड रिबन क्लब) आणि डॉ. शितलकुमार पाटील (व्हाइस चेअरमन रेड रिबन क्लब) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
बीएचएमएसचे वि‌द्यार्थी / वि‌द्यार्थीनीं यांनी एचआयव्हीचा प्रसार, प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सामुहिक नृत्य नाटक सादर केले.
आपल्या समाजात अजुनही एचआयव्ही बाबत हवी तेवढी जागरुकता नाही, भेद‌भावाची भावना आहे. त्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराबद्‌दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी हा आजार नेमका काय आहे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठीच हा फ्लॅश मॉब राबवण्यात आला. संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील व कॅम्पस कोऑर्डीनेटर  डॉ. सतिश पाटील यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.  यावेळी शिक्षक, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.