प्रतिष्ठा न्यूज

अमरावती येथील श्री सोमेश्वर संस्थानाची 50 कोटींची जमीन 960 रुपयांना विकली ! मंदिरांच्या जमिनी लाटणार्‍या तहसिलदारांसह सर्व दोषींना त्वरित अटक करा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

प्रतिष्ठा न्यूज 
अमरावती प्रतिनिधी : अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानाची 50 कोटी रुपयांची जमीन तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ 960 रुपयांना विकल्याची अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आला आहेमहाराष्ट्र मंदिर महासंघ या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध करत आहोततसेच या प्रकरणी तातडीने तहसीलदार आणि सर्व संबंधित दोषींची चौकशी करून त्यांना त्वरित अटक करावीअशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

      काय आहे प्रकरण श्री सोमेश्वर महादेव संस्थानअमरावतीता.जि.अमरावती या धार्मिक संस्थानाच्या मालकीची मौजापेठ अमरावतीताजि.अमरावती येथे शेत सर्व्हे क्र. 94, क्षेत्रफळ हेक्टर85आरही शेतजमीन आहेसदर शेतजमीन हडप करण्याच्या हेतूने सुमन कोठार यांनी तहसीलदारअमरावती यांचे समक्ष सदर शेतजमीन खरेदी करुन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होताया प्रकरणात तहसीलदारअमरावती विजय सुखदेव लोखंडे यांनी कुळ कायद्याच्या तरतुदीचे उल्लघंन करत सदर संस्थानाचा प्राथमिक आक्षेप अर्ज निकाली न काढता या प्रकरणात कोणतेही साक्षपुरावे न घेता संस्थानाच्या मालकीची 50 कोटी रुपये मूल्य असलेली जमीन केवळ 960 रुपयांमध्ये खरेदी करुन देण्याचा बेकायदेशीर आदेश काढलाहा आदेश 26.09.2024 यादिवशी पारित करण्यात आला आणि आदेश पारित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दि.27.09.2024 यादिवशी अपील कालावधीची मुदत संपण्यापूर्वी खरेदीसुध्दा नोंदवून घेण्यात आली.

       तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांनी श्री सोमेश्वर संस्थानाच्या शेतजमीन प्रकरणात अनियमितता करुन बेकायदेशीरपणे संस्थानाच्या शेतजमीनीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला आहेयात संस्थानाची आणि संस्थानाच्या भक्तगणांची घोर फसवणूक झाली आहेतहसीलदार विजय लोखंडे यांनी तहसीलदार पदाचा गैरवापर करुन या प्रकरणात बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवलीकूळकायद्यातील कायदेशीर तरतूदींचे आणि शासकीय परिपत्रकाचे स्पष्टपणे उल्लघंन केले आहेसंस्थानची जमीन हडपण्याकरता स्थानिक बिल्डर लॉबीही सक्रिय असल्याचे दिसून येतेत्यामुळे तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांच्या विरोधात सेवाशिस्त व नियम व इतर सक्षम कायद्याच्या अंतर्गत विभागीय चौकशी करुन कठोर कायदेशीर कारवाई करावीअशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केली आहे. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य कोअर कमिटी पदाधिकारी श्रीअनुप जयस्वाल आणि महासंघाचे जिल्हा निमंत्रक श्रीकैलाश पनपालीया यांनी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारीअमरावती यांच्याकडे याविषयी तक्रार अर्ज सादर केला आहेतरी तहसिलदार विजय लोखंडे यांसह सर्व दोषींवर कारवाई न केल्यास मंदिर महासंघाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईलअसा इशारा महासंघाने दिला आहे.

श्री. सुनील घनवट,
राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.
(संपर्क : 7020383264)
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.