प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस.इंग्लिश स्कुल तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली:  महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुल तर्फे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ढोल, ताशा, लेझीम, झांज यांच्या गजरात उंट, घोडे आणि रथ या लवाजम्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विश्रामबाग चौकामध्ये, छत्रपती शिवाजी जन्म सोहळा सुमधुर आवाजात सुप्रिया म्हैशाळकर व इतर महिला पालक वर्ग यांनी पाळणा म्हणून साजरा केला. बाल शिवाजीचा पाळणा ऐकत असताना शिवजन्मोत्सवाचा प्रसंग सर्वांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.
        प्रशालेचा इ. सहावीचा विद्यार्थी अनंत अमित दणाणे याने वीर रसाने भरलेला पोवाडा म्हणून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. या सुंदर सादरीकरणाबरोबरच इ. पहिलीचा विद्यार्थी आयुषमान सुरज माळी या बालचिमुकल्याने गारद म्हणून सर्वांचीच मने जिंकली. प्रशालेच्या पाचशे विद्यार्थ्यांच्या समूहाने आपल्या उत्कृष्ट नृत्यातून वीर गीते ( शिवबा राजे….., युगत मांडली…..) सादर करून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. प्रशालेचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने झांज, लेझीम, फुगडी यांचे रोमांचकारी  प्रदर्शन सादर केले. पालकांचा उत्साह अवर्णनीय होता.
       याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांनी या मंगलमय वातावरणाची अनुभूती घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा सोनेरी व अविस्मरणीय बनला. या शिवजयंती सोहळ्याचे नियोजन आणि सूत्रसंचालन प्रशालेचे क्रीडा शिक्षक अतुल जाधव संदीप पवार यांनी केले. या सोहळ्यासाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच उत्साहीत पालकवर्ग उपस्थित होता. “इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर अन विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती” अशा या महान राजास एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलतर्फे कोटी कोटी प्रणाम करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.