प्रतिष्ठा न्यूज

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे पाणीपुरवठा सुरळीत करून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी बैठक संपन्न : खासदार श्री संजयकाका पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एक मार्च २०२४ रोजी महानगरपालिकेच्या माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली होती. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त श्री सुनील पवार साहेब, संबंधित विभागाचे सर्व अधिकारी तसेच वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचे काही तज्ञ यांचे सोबत एकत्रित संपूर्ण जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यासंबंधी आज सांगली येथे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयुक्त श्री सुनील पवार साहेब,वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर श्री डॉ व्ही ए दबडे सर, डॉ.जी आर मुनवल्ली सर, डॉ ए के कोकणे सर, असिस्टंट प्रोफेसर बी आर कवठेकर सर आणि जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्या सौ. ज्योती देवकर मॅडम यांचेसोबत आज बैठक पार पडली, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
सदर बैठकीमध्ये ०१ मार्च २०२४ रोजी केलेल्या सूचनांप्रमाणे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या कमिटीने एक रिपोर्ट आज सादर केला.
या रिपोर्टमध्ये जुना ३६ एम एल डी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्याचे रिपेरिंग करणे गरजेचे आहे , नवीन प्लांट ७० एम एल डी क्षमतेचा आहे , तो फक्त ५४ एम एल डी क्षमतेने चालवला जातो, या सर्व बाबींमध्ये कार्यांवित यंत्रणा सुधारित करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये सदर शुद्धीकरण केंद्राच्या बाबत काही समितीने मार्गदर्शन केलेले आहे. काही एजन्सी नेमण्याचे आज निश्चित झाले आणि येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. क्लोरिनेशन युनिट बसवण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या, प्रत्यक्ष साईट विजिट करून सॅम्पल कलेक्शन करून त्यांचे ॲनालिसिस करणे, डाटा ॲनालिसिस करून व्यवस्थापन त्याचे करणे संबंधी कमिटीने रिपोर्ट सादर केला आहे. त्या रिपोर्टप्रमाणे सांगलीला शुद्ध आणि नियमित पाणी मिळवून देण्याच्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे आज त्या संबंधी बैठक पार पडली, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.