प्रतिष्ठा न्यूज

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब व स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्याबरोबर झालेल्या घटनांमध्ये एकच साम्य : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याबरोबर दिल्लीत झालेली एक्सीडेंट घटना ही पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडलेली घटना होती. त्यावेळेला त्यांच्या गाडीत तिघेजण होते त्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर, सेक्रेटरी व स्वतः गोपीनाथ मुंडे साहेब होते.त्याच पद्धतीने मराठा समाजाचे व शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्या ब रोबर घडलेली घटना ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घडली होती आणि त्या वेळेला ही त्यांच्या बरोबर गाडीमध्ये तीघे जणच होते यामध्ये त्यांचा ड्रायव्हर, गार्ड व स्वतः विनायक मेटे साहेब या दोन्ही घटनां मध्ये सर्व गोष्टी साम्य आहे .स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याबरोबर ही जी घटना घडली आणि त्या वेळेला ही दबक्या आवाजात चर्चा होती की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ओबीसी समाज चा चेहरा व इतर समाजामध्ये त्यांची वाढलेली लोकप्रियता बघून त्यांचाही त्यावेळेला घात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत होती . ज्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा मृत्यू झाला त्यावेळेला ते एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते आणि त्याच वेळेला त्यांच्या मृत्यू झाला असावा आणि त्यांची बॉडी गाडीमध्ये टाकून एक्सीडेंट झाला असे दाखवले गेले होते यामध्येही फक्त गोपीनाथ मुंडे साहेबच मृत्यू झाले होता व त्यांची बॉडी ही पांढरी पडली होती यावरून त्यांचा मृत्यू पाठीमागील सहा ते सात तासाच्या अगोदर झाला असावा असेही काही जणांनी संशय व्यक्त केला होता परंतु त्या वेळेला त्यांच्या गाडीतील दोघेजण वाचले होते. त्याच पद्धतीने मराठा समाज व शिवसंग्राम संघटनेचे वाढलेली ताकद व मराठा समाजाचे नेतृत्व या हेतूने कोणीतरी त्यांचा घात केला असावा अशी चर्चा सर्वत्र होत आहे ज्या वेळेला त्यांची बॉडी हॉस्पिटल मध्ये त्यांच्या घरच्याने बघितली त्यावेळेला ती पांढरी पडली होती .मी काही डॉक्टरना व एक्सपर्ट व पी एम करणारे डॉक्टरां बरोबर चर्चा केली असता जर मृत्यू सहा ते सात तास होऊन गेला असेल तरच बॉडी पांढरी आणि पिवळे पडते असं डॉक्टरने सांगितलं यावरून स्वर्गीय मेटे साहेब यांची ही डेड बॉडी पांढरी व पिवळसर झाली होती असं त्यांच्या डॉक्टर पत्नीने पसांगितले होते. यावरून स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांचा ही आधीच मृत्यू झाला असावाआणि त्यांची बॉडी ही गाडी मध्ये ठेवून अशाच पद्धतीने त्यांचा कोणाला शंका येऊ नये म्हणून एक्सीडेंट केला अशी शंका सर्वांना येत आहे आणि हे अशीच असावी असे माझे मत आहे. याची सीबीआय सीआयडी मार्फत कसून चौकशी व्हावीअशी माहिती सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.